Mumbai, Dec 5, 2018: Full Marathon defending champion Karan Singh, a former Mumbai Marathon winner, and last year’s runner-up Mohit Rathore, both from the Indian Army, will lead a strong field of 36 of the country’s top most long distance male and female athletes in the 8th Indiabulls Home Loans Vasai Virar Mayors Marathon, in association with Cigna TTK, which will be flagged off from three different locations, in Virar and Vasai on Sunday, December 9, 2018.
Joining the country’s leading distance runners will be around 18000 plus participants, among them 840 Full Marathoners, 4300 plus Half Marathoners, 2500 plus 11 km Runners and 650 athletes in the new 5K timed category. Running in their wake will be around 10000 plus athletes in the junior age group races, over 1.5 kms, 3 kms, 5 kms, 7 kms and 11 kms and the Dhamal Dhaav over 4 kms.
The Battle Run, an exclusive event for 4-member corporate and running group teams over the half marathon distance has drawn 31 entries. The fastest running club in the half marathon Battle Run will be awarded a rolling trophy and prize money of Rs 1.50 lakhs, while the runner-up team and third placed team will take home Rs 90,000 and Rs 60,000 respectively.
Organised by the Vasai Virar City Municipal Corporation and the Vasai Taluka Kala Kreeda Vikas Mandal and promoted by Aryanz Sports PR & Events, the Indiabulls Home Loans Vasai Virar Mayor’s Marathon provides a prize fund in excess of Rs 45 lakhs, which is the richest in the country for Indian athletes and amateur runners.
The winner of the Full Marathon for men will stand to gain Rs 2.50 lakh, while the male and female winners of the Half Marathon will take home Rs 1.25 lakh each. There is an increase in the prize money for amateur runners as well in the different age groups.
Sprint queen Dutee Chand to be Guest of Honour: Keeping up with the practice of inviting top sports persons to be the guest of honour on race day, this year the Vasai Virar City Municipal Corporation has invited sprint queen Dutee Chand.
Dutee Chand is a double silver medalist at the recently concluded Jakarta Asian Games and also the third Indian women to ever qualify for the Women’s 100 metres at the Olympic Games.
Strong Elite Athlete field: Another strong battle for top honours is expected in the Men’s Full Marathon between champion Karan Singh and Mohit Rathore. Last year saw a sprint finish to the tape, with the experienced Karan getting the better of his Army colleague in the final stretch. Karan, the winner of the Mumbai Marathon in 2016, is in good form this year and will be looking to retain his title.
Besides Karan and Mohit, the other fancied names in the full marathon are Pankaj Dhaka, runner-up at IBVVMM 2016, Sanjith T Luwang, who placed third at the Mumbai Marathon 2017, Ashish Kumar, winner of the Jaipur Marathon 2017 and Laljee Yadav, to name a few.
The men’s half marathon will be spearheaded by Kalidas Hirave, who has a personal best timing of 1:03.27, among the fastest in the country. Kalidas clocked 1:03.46 while finishing second in the PSB Half Marathon 2018, and clocked 1:04.25 at the recent Delhi Half.
Also in the fray will be last year’s third placed athlete Shankar Man Thapa, Deepak Kumbhar, who finished third at the Mumbai Marathon 2018, Rahul Pal Kumar, A B Baliappa, Srinu Bugatha, Durga Bahadur Thapa and Govind Singh, some of the Indian finest athletes over the half marathon distance.
The women’s half marathon will be spearheaded by Monika Athare, the current National champion, who clocked 1:16.55 at the Delhi Half 2018. Monika will have to contend with the challenge from last year’s runner-up Chinta Yadav, besides fancied names like Kiran Sahdev, Ritu Pal, Jyoti Chauhan and Manju Yadav.
Race Timings: The Full Marathon will be flagged off from New Viva College, Virar W at 6.00 am, while the Half Marathon will be flagged off from Vasai West at 6.20 am. The 11Km Run will be flagged off from Vasant Nagari at 6.20 am, while the 5km Timed Run will be flagged off at 7.30 am, also from New Viva College. All the junior age category events, along with the runs for senior citizens as well as the Dhamaal Dhaav will be flagged off from New Viva College.
Special Marathon Train: Continuing in its support for the event, Western Railway has announced a special train for the Indiabulls Home Loans Vasai Virar Mayor’s Marathon, which will leave Churchgate Station at 3.00 a.m. and reach Vasai and Virar at 4.23 am and 4.31 am respectively, after stopping at all stations. Free transport will be provided to all participants from Vasai Station, Nalla Sopara Station and Virar Station to the respective start points.
Medical Partner: Riddhi Vinayak Multi Speciality Hospital will be the Medical Partner to the event, and will be manning the Medical Base Camps and the Medical Stations, along with doctors from the Virar Medical Association and will be stocked with ice packs, first aid kits, pain relief sprays as well as energy drinks. Ten fully equipped ambulances as well as doctors on motorbikes will be patrolling the race route to provide timely medical assistance in case of an emergency.
Facilities on Race Route: 30,000 litres of water will be distributed through a total of 24 stations and 15,000 litres of Enerzal through ten energy drink stations. There will also be six Orange stations and cool sponge stations on the second leg of the Full Marathon and the Half Marathon. Medical Base Camps will be set up at the finish points of the Full Marathon and Half Marathon as well as the 11KM Run. There will also be 13 medical stations along the route.
The event has the support of the Palghar District Police, who will be responsible for the Law and Order as well as traffic control on the route. They will be assisted by over 300 private security personnel.
125 officials, from all over the State, coordinated by the Palghar District Athletic Association, will b e responsible for the technical conduct of the event, while Dr. Jaywant Mane will the AFI Technical Delegate for the event. A total of 700 volunteers, among them teachers and students will be on hand to assist in the conduct of the race.
मुंबई, 5 डिसेंबर, 2018 : पूर्ण मॅरेथॉनमधील भारतीय सैन्यदलातील गतविजेता करण सिंग आणि गेल्या वर्षीचा उप विजेता मोहीत राठोड हे आठव्या इंडियाबुल्स होम लोन्स व सिग्ना टीटीके वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये भारतातील 36 आघाडीच्या पुरुष व महिला अॅथलीट चमुचे प्रतिनिधित्व करतील. 9 डिसेंबरला वसई व विरार या ठिकाणाहून मॅरेथॉनला सुरुवात होईल.
या स्पर्धेमध्ये आघाडीच्या धावपटूंसोबत 18 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. यामध्ये 840 पूर्ण मॅरेथॉनमध्ये, 4300 हून अधिक अर्धमॅरेथॉनमध्ये, 2500 हून अधिक 11 किमी स्पर्धेत आणि 650 अॅथलिट नवीन 5 किमी गटात सहभाग नोंदविणार आहेत. ज्युनिअर गटात 10 हजारहून अधिक अॅथलीट सहभागी होतील. ज्युनिअर गटाअंतर्गत 1.5 किमी, 3 किमी, 5 किमी, 7 किमी, 11 किमी आणि धमाल धाव 4 किमी यांचा समावेश आहे. अर्ध मॅरेथॉनमध्ये चार सदस्य असणाऱ्या बॅटल रनमध्ये 31 संघांनी नोंद केली.
वसई विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित आर्यन्झ स्पोर्ट्स पीआर अँड इव्हेंट्सकडून प्रमोट करण्यात येणाऱ्या इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये 45 लाखाहून अधिकची बक्षिसे देण्यात येणार आहे. भारतातील अॅथलीट व अमॅच्युर धावपटूसाठीची देशातील सर्वाधिक बक्षीस रक्कम असणारी मॅरेथॉन आहे. या मॅरेथॉनमध्ये रनिंग ग्रुपसाठी विशेष बॅटल रन गटाचा समावेश करण्यात आला आहे.पूर्ण मरेथॉनमधील पुरुष गटातील विजेत्याला 2.50 लाख तर, पुरुष व महिला अर्धमॅरेथॉनमधील विजेत्यांना प्रत्येकी 1.25 लाख मिळणार आहेत. यासोबत विविध गटातील अमॅच्युर धावपटूसाठीच्या बक्षीस रकमेतही वाढ करण्यात आली आहे.
स्टार स्प्रिंटर दुती चंद असणार प्रमुख अतिथी
वसई विरार शहर महानगरपालिकेकडून यावर्षी स्पर्धेला भारताची आघाडीची धावपटू दुती चंदची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत दुती चंदने दोन रौप्यपदक मिळवत छाप पाडली होती. यासोबतच ऑलिम्पिक स्पर्धेच्या महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पात्रता मिळवणारी तिसरी भारतीय महिला अॅथलीट आहे.वसई विरार महानगरपालिकेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉनचे आयोजन 9 डिसेंबरला होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. महानगरपालिका वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आणि स्पर्धेचे प्रमोटर आर्यन्झ स्पोर्ट्स पीआर अँड इव्हेंट्स यांच्यासोबत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हजारो स्पर्धकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासोबतच हा अनुभव कायमचा स्मरणात राहावा यासाठी मेहनत घेत आहे. ट्रॅफिकचा कोणताही अडथळा स्पर्धकांना होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजन चांगल्या रीतीने व्हावे यासाठी सर्वच विभाग मेहनत घेत आहे असे महापौर श्री रुपेश जाधव म्हणाले.
- आघाडीचे एलिट अॅथलीट नोंदविणार सहभाग
स्पर्धेतील पुरुष पूर्ण मॅरेथॉनमध्ये चॅम्पियन करण सिंग आणि मोहित राठोड यामध्ये चांगली चुरस पहायला मिळणार आहे.करण हा मुंबई मॅरेथॉन 2016 चा विजेता आहे. तसेच यावर्षी तो चांगल्या फॉर्मात देखील आहे व यावेळी आपले जेतेपद कायम ठेवण्याचा त्याचा प्रयोग असणार आहे.करण व मोहीत यांच्याशिवाय पूर्ण मॅरेथॉनमध्ये पंकज ढाका हा 2016 च्या स्पर्धेत उपविजेता होता, मुंबई मॅरेथॉनमध्ये 2017 साली तिसरे स्थान मिळवणारा संजिथ लुवांग, जयपूर मॅरेथॉन 2017 सालचा विजेता आशिष कुमार यांसह लालजी यादव व जी बी पाटले सहभागी होणार आहेत.
पुरुष अर्धमॅरेथॉनमध्ये कालिदास हिरवे सहभाग नोंदवेल त्याची सर्वोत्तम वेळ 1:03.27 अशी आहे. पीएसबी अर्धमॅरेथॉन 2018 मध्ये कालिदासने 1:03.46 अशी वेळ नोंदवली होती. तर, दिल्ली अर्धमॅरेथॉनमध्ये त्याने 1:04.25 अशी वेळ नोंदवली. यासोबत गेल्या वर्षी तिसरे स्थान मिळवणारा शंकर मान थापा,मुंबई मॅरेथॉन 2018 मध्ये तिसरे स्थान मिळवणारा दीपक कुंभार, राहुल पाल कुमार, ए. बी. बलीअप्पा, श्रीनू बुगाथा, दुर्गा बहादूर थापा आणि गोविंद सिंग हे आपला सहभाग नोंदवतील.
महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन मोनिका आथरेवर सर्वांचे लक्ष असेल. दिल्ली अर्धमॅरेथॉनमध्ये तिने 1:16.55 अशी वेळ नोंदवली होती. तिला गेल्या वर्षीची उपविजेती चिंता यादव सह किरण सहदेव, रितू पाल, ज्योती चौहान आणि मंजू यादव यांचे आव्हान असेल.
बॅटल रन :
बॅटल रनचे हे तिसरे वर्ष असून देशातील रनिंग क्लबसाठी या रनचा समावेश करण्यात आला आहे. इंडिया बुल्स होम लोन्स या स्पर्धेच्या मुख्य प्रयोजकांकडून या बॅटल रनचा समावेश करण्यात आला असून एकूण 31 संघांनी अर्ध मॅरेथॉनमध्ये रनसाठी नोंदणी केली आहे.अर्ध मॅरेथॉन बॅटल रनमधील सर्वात जलद वेळ नोंदविणाऱ्या क्लबला चषक व 1.50 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. तर, उपविजेत्या संघास व तिसरे स्थान मिळवणाऱ्या संघास अनुक्रमे 90 हजार व 60 हजार रुपये देण्यात येतील.
- स्पर्धेच्या वेळा :
पूर्ण मॅरेथॉनला न्यू विवा कॉलेज, विरार पश्चिम येथून सकाळी 6.00 वाजता सुरुवात होईल तर, अर्धमॅरेथॉन वसई पश्चिम येथून सकाळी 6.20 वाजता सुरू होईल. 11 किमी रनला वसंत नगरी येथून सकाळी 6.20 सुरुवात होईल. तर, 5 किमी टाईम रन सकाळी 7.30 वाजता न्यू विवा कॉलेज येथून सुरू होईल.सर्व ज्युनिअर गटातील स्पर्धा तसेच सिनियर सिटीझन रन व धमाल धाव न्यू विवा कॉलेज येथून सुरू होतील.
विशेष मॅरेथॉन ट्रेन :
इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. ही ट्रेन सकाळी 3.00 वाजता चर्चगेट स्टेशनहून सुटेलव वसईला 4.23 मिनिटांनी व विरारला 4.31 मिनिटांनी पोहोचेल. ही ट्रेन सर्व स्टेशनवर थांबेल.स्पर्धकांना वसई स्टेशन, नालासोपारा स्टेशन व विरार स्टेशनहुन स्पर्धास्थळी पोहोचण्यासाठी निशुल्क वाहतुकीची सेवा देण्यात येणार आहे.
- मेडिकल पार्टनर :
रिद्धी विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या स्पर्धेसाठी मेडिकल पार्टनर असेल.मेडिकल बेस कॅम्प आणि मेडिकल स्टेशन्ससह विरार मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर हे आईस पॅक, फर्स्ट एड किट व पेन रिलीफ स्प्रेसोबत सज्ज असतील.दहा रुग्णवाहिकासोबत मोटरबाईकवर डॉक्टर स्पर्धा मार्गावर आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात तयार असतील.
स्पर्धा मार्गातील सुविधा :
24 वॉटर स्टेशनच्या माध्यमातून 30 हजार लिटर पाण्याचे वाटप करण्यात येईल आणि एनर्जी ड्रिंक स्टेशनमार्फत 15 हजार लीटर एनेरझाल देण्यात येईल. पूर्ण मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉनच्या दुसऱ्या सत्रात ऑरेंज स्टेशन आणि कूल स्पॉंज स्टेशन असणार आहेत. पूर्ण व अर्ध मॅरेथॉन सोबत 11 किमी रनच्या फिनिश पॉईंटला मेडिकल बेस कॅम्प असेल. तर स्पर्धा मार्गात 13 मेडिकल स्टेशन्स असतील.
स्पर्धेला पालघर जिल्हा पोलिस यांचा पाठिंबा असून कायदा सुव्यवस्थेसोबत स्पर्धा मार्गातील ट्रॅफिकची जबाबदारी त्यांच्यावर असेल.त्यांना 300 खासगी सुरक्षा रक्षक मदत करतील. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी ही राज्यभरातून आलेल्या 125 पदाधिकाऱ्यांवर असेल व त्यांच्याशी समन्वय साधण्याचे काम पालघर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे असेल. या स्पर्धेसाठी डॉ. जयवंत माने एएफआयचे तांत्रिक पदाधिकारी म्हणून काम पाहतील. यासोबतच 700 स्वयंसेवक देखील स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करतील.
☺❤ chia sẻ ủng hộ admin ❤☺
0 comments :
Post a Comment