सध्या लग्नसराई सुरू आहे. कलाकारांसह मालिकांमध्ये देखील लगीनघाई दिसत आहे. झी युवावरील तू अशी जवळी राहा मालिकेत देखील मनवा आणि राजवीर हे लग्नबेडीत अडकणारआहेत. लग्न अगदी मराठमोळ्या वैदिक पद्धतीत पार पडणार असून मेहंदी, हळदी, संगीत या सर्व समारंभाची लगबग मालिकेत दिसत आहे. मनवाच्या संगीतमध्ये गायक रोहित राऊतसज्ज होऊन या जोडप्यासाठी एक खास गाणं सादर करणार आहे. नाळ चित्रपटातील जाऊ दे न व या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर रोहितने एक खास गाणं तयार करून मनवाच्यासंगीत समारंभात सादर केलं. या गाण्याची झलक चाहत्यांना सोशल मीडियावर पाहायला मिळाली आणि या सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद देखील दिली. मनवा आणि राजवीरचा लग्नसोहळा रविवार ९ डिसेंबर रोजी ७ वाजता १ तासाच्या विशेष भागात संपन्न होणार आहे.
☺❤ chia sẻ ủng hộ admin ❤☺
0 comments :
Post a Comment