माधुरी... प्रत्येक मराठी माणसाला भावणारं हास्य... कित्येक वर्ष आपल्या अदांनी जगभरातील चाहत्यांना घायाळ करणारी ही माधुरी कधीतरी आपल्यामराठी चित्रपटात झळकावी, ही प्रत्येक मराठी मनाची इच्छा... आपल्या चाहत्यांचं मन ओळखून या हास्यसम्राज्ञीने गेल्या संक्रातीला गोड बातमी दिलीआणि ती म्हणजे आपल्या मराठी चित्रपटाची... हा चित्रपट म्हणजे... ‘बकेट लिस्ट’
माधुरी दिक्षित या हास्यसम्राज्ञीचा पहिला – वहिला मराठी चित्रपट,धर्मा प्रोडक्शन्सचं मराठी चित्रपटासृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल, रणबीर कपूरचीमराठी चित्रपटात दिसलेली पहिली झलक तर प्रदर्शनापूर्वीच हाऊसफुल्ल झालेला पहिला मराठी सिनेमा... या आणि अशा कित्येक विशेषणांनीसमृध्द ‘बकेट लिस्ट’ आता पहिल्यांदा टेलिव्हिजनवर एंट्री मारणार आहे ते म्हणजे ‘सोनी मराठी’च्या माध्यमातून… या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजनप्रिमियर येत्या 16 डिसेंबरला सोनी मराठीवर पाहता येणार आहे. आपल्या प्रेक्षकांसोबत अतूट नातं विणणाऱ्या सोनी मराठीने नेहमीच आपलं वेगळेपणजपलं आहे. या वाहिनीवर सध्या सुरू असणऱ्या मालिका असतील, त्यात काम करणारी कलाकार मंडळी असतील किंवा त्यावर दाखवले जाणारे चित्रपटही प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट असावी याकडे सोनी मराठीच्या टीमचा कल असतो.
याच जाणीवेतून सोनी मराठी माधुरीची ‘बकेट लिस्ट’ पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलं आहे. आपल्याधकाधकीच्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीचा जादुई मंत्रा महाराष्ट्राची धक धक गर्ल माधुरी, ‘बकेट लिस्ट’ च्या निमित्तानेप्रेक्षकांसाठी घेऊन आली होती. आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींची एक यादी केली तर त्या पूर्ण करणं सोपं जातं. या छोट्या-छोट्या गोष्टींमधूनमिळणारा आनंद खूप मोठा असतो ज्याने आयुष्य समृध्द होतं जातं... हा संदेश देणारी बकेट लिस्ट प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. जगण्याची भाषाबदलून आपलं आयुष्य जगताना, आपल्या आनंदाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही गोष्ट दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी या चित्रपटातूनअगदी अचूक मांडली आहे.
विनोदाची झालर असणाऱ्या या चित्रपटात माधुरीबरोबरच सुमित राघवन, रेणुका शहाणे, वंदना गुप्ते, प्रदिप वेलणकर, दिलीप प्रभावळकर, इलाभाटे, शुभा खोटे आणि रेशम टिपणीस या कलाकारांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. या सगळ्यांच्याच अभिनयाची ही गोड-तिखट मिसळ तुम्हीनव्याने अनुभवू शकणार आहात सोनी मराठीवर, 16 डिसेंबर ला होणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरच्या निमित्ताने... तेव्हा या प्रिमियरला तुमची हजेरीनक्की असू द्या.
☺❤ chia sẻ ủng hộ admin ❤☺
0 comments :
Post a Comment